
- Our Tech
- For Work
- About Us
- …
- Our Tech
- For Work
- About Us
- Our Tech
- For Work
- About Us
- …
- Our Tech
- For Work
- About Us
काही सामान्य प्रश्न | Kuch Aam Sawal | (FAQ)
वाईसा कोण आहे आणि ती तुमची कशी मदत करू शकते?
वाईसा ही एक AI चॅटबॉट आहे जी तुमच्या रोजच्या भावना, जसे की उदासी, चिंता, राग, गोंधळ, याबरोबर मदत करते. तुम्ही कधीही वाईसाशी बोलू शकता, ती जज न करता तुमचं ऐकून घेते आणि मन हलकं करण्यासाठी उपयोगी साधने व उपाय सुचवते. हे उपाय संशोधनावर आधारित आहेत आणि अनेक लोकांसाठी उपयोगी ठरले आहेत. वाईसा ही जेंव्हा काय करावं समजत नाही, किंवा भावना समजून घ्यायच्या असतात, तेव्हा ही मैत्रीण आणि मार्गदर्शक, नेहमी तुमच्या सोबत असते.
Wysa kaun hai aur kaise madad karti hai?
Wysa, Chatbot aur book ke istemaal se tumhari feelings, jaise udaasi, chinta, gussa, confusion, sambhalne mein madad karti hai.
Tum kabhi bhi Wysa se baat kar sakte ho. Wo bina judge kiye tumhari baat dhyan se sunti hai aur mann halka karne ke liye helpful, research-based tools deti hai. Wysa ek dost aur guide jaisi hai, jab samajh nahi aata kya karna hai, ya emotions samajhne hote hain, tab hamesha saath hoti hai.वर्कबुक आणि डिजिटल वाईसा एकत्र कसे वापरायचे?
वर्कबुकमधील प्रत्येक धडा जीवनातील महत्त्वाचे कौशल्य शिकवतो, अवघड भावना हाताळणे, आत्मविश्वास निर्माण करणे, समस्या सोडवण्यासाठी वेगळे विचार करणे, आणि चांगल्या सवयी तयार करणे.
हा प्रवास आणखी प्रभावी करण्यासाठी, वर्कबुकसोबत एक डिजिटल साथीदार आहे: वाईसा वेबसाईट.
वर्कबुकमध्ये QR कोड दिलेले असतात, फोनचा कॅमेरा वापरून ते स्कॅन करा. प्रत्येक कोड त्या धड्याशी संबंधित खास चॅट उघडतो.
तुम्ही वाईसाशी बोलू शकता, नवीन कौशल्य शिकू शकता, आणि मग परत वर्कबुकमध्ये येऊन त्यावर विचार करू शकता व लिहू शकता.वेबसाईटवर तुम्हाला उपयोगी टूल्स मिळतील, जे लगेच वापरता येतात.
असं समजा:
📘 वर्कबुक: तुमच्या भावना समजून घेण्यासाठी, विचार मांडण्यासाठी, आणि तुमचा प्रवास समजून घेण्यासाठी.
📲 वेबसाईट (QR कोड): जिथे तुम्हाला त्या भावना व विषयांसाठी मदतीची साधनं मिळतील. जेव्हा हवं असेल, तेव्हा कोड स्कॅन करा आणि मदत मिळवा.एकत्र वापरल्यावर तुमचं शिकणं तुम्हाला साजेसं, उपयोगी आणि सोपं होतं.Workbook aur Digital Wysa saath mein kaise istemaal karein?
Workbook ka har chapter ek important skill sikhata hai, badi feelings handle karna, confidence build karna, problem-solving, aur acchi habits banana.
Is experience ko aur effective banane ke liye Workbook ke saath Wysa website digital partner ki tarah kaam karti hai.
Workbook mein diye QR codes phone ke camera se scan karo. Har QR code us chapter se related ek special chat open karta hai.
Tum Wysa se baat karke naye skills seekh sakte ho, aur phir workbook mein wapas jaake likh sakte ho.Ise is tarah socho:
📘 Workbook - feelings samajhne, sochne aur apni journey note karne ke liye.
📲 Website (QR code) -wo jagah jahan tumhe in topic ke tools milte hain, jab chaaho scan karo aur madad lo.Dono saath mein istemaal karne se learning simple, personal aur useful ban jaati hai.
काही अडचण आली तर काय करावं?
📞शाळेत शिक्षक किंवा वेलबीइंग वर्कर आले असतील, तर त्यांच्याशी बोला.
📧 किंवा आम्हाला [email protected] वर ईमेल करा. आम्ही तुमची मदत करू.
Koi problem aaye toh kya karein?
📞 School mein teacher ya wellbeing worker hon, to unse baat karo.
📧 Ya humein email karo: [email protected] par. Hum madad karenge.
वाईसाशी मी कशाबद्दल गोष्टींबद्दल बोलू शकतो/शकते?
तुम्ही कोणत्याही अशा गोष्टींबद्दल बोलू शकता ज्या तुमचं मन दुखावतात
- दुःखी वाटणं, तणाव, अस्वस्थता
- राग
- काळजी, चिंता
- मित्रांशी किंवा कुटुंबीयांशी भांडणं
- एकटं वाटणं, बाजूला पडल्यासारखं वाटणं, आत्मविश्वास दुखावणं
वाईसा तुम्हाला भावना समजून घ्यायला आणि स्वतःवर अधिक नियंत्रण ठेवायला शिकवते.
Wysa chatbot se main kis baare mein baat kar sakta/sakti hoon?
Tumhari life se judi koi bhi baat ya problem Wysa chatbot se share kar sakte ho, jaise:
- Dukh, stress, anxiety
- Gussa
- Chinta
- Friends ya family se jhagde
- Akela lagna, alag padna, confidence tootna
Wysa tumhe feelings samajhne aur khud par zyada control rakhna sikhati hai.
वाईसा वापरणं सुरक्षित आहे का?
हो. वाईसा तुमची वैयक्तिक माहिती गोळा करत नाही, आणि तुमचं बोलणं गुप्त आणि सुरक्षित असतं. तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता, काहीही शेअर केलं जात नाही.
Wysa chatbot istemaal karna safe hai kya?
Haan. Wysa tumhari personal information collect nahi karti. Tumhari baat poori tarah private aur safe hoti hai. Kuch bhi share nahi hota, to tum aaraam se baat kar sakte ho.
वाईसा अचानक बंद पडलं तर काय करायचं?
हे करून पाहा:
- पेज पुन्हा सुरू करा
- टॅब बंद करा आणि QR कोड पुन्हा स्कॅन करा
- तुमच्या ब्राउझरमध्ये वाईसा वेबसाईट एकापेक्षा जास्त टॅबमध्ये उघडलेली असेल तर, फक्त एकच टॅब ठेवा आणि बाकी बंद करा. उरलेला टॅब रिफ्रेश करा.
- तरीही अडचण असल्यास [email protected] वर ईमेल करा.
Wysa chatbot kaam na kare tab kya karun?
Ye try karo:
- Page restart karo
- Tab band karke QR code dobara scan karo
- Agar website kai tabs mein open ho, toh sirf ek tab rakho aur refresh karo
- Agar phir bhi problem ho toh email karo: [email protected] par
वाईसाशी संवाद संपल्यावर तिला कसं बंद करायचं?
- बॅक बटण दाबा
- ब्राउझरचा टॅब किंवा अॅप बंद करा
बस्स!
Chat khatam hone ke baad Wysa kaise band karein?
- Back button dabao. Browser ka tab band karo
Bas ho gaya.
वाईसा चॅट आणि वाईसा वेबसाईट यामधील फरक काय आहे?
💬 वाईसा चॅट = QR कोड स्कॅन केल्यावर लगेच विशिष्ट विषयावर आधारित संवाद चालू होतो (जसं की राग हाताळणं, आत्मविश्वास वाढवणं इ.)
🧩 वाईसा वेबसाईट = वेगवेगळ्या भावना आणि विषयांवर आधारित टूल्स व चॅट्स असलेला एक मुख्य स्क्रीनQR कोड स्कॅन केल्यावर चॅट विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील ‘X’ किंवा ‘–’ बटणावर टॅप केल्याने वेबसाईटचं मुख्य पान उघडतं.
Wysa chat aur Wysa website mein kya farak hai?
💬 Wysa Chat – QR code scan karte hi ek topic par based chat open hoti hai (jaise gussa manage karna, confidence badana).
🧩 Wysa Website – main screen jahan alag-alag emotions aur topics ke tools aur chats milte hain.Chat window ke top-right mein ‘X’ ya ‘–’ dabane se website ka main page open ho jaata hai.
मी वेगवेगळ्या फोनवरून QR कोड स्कॅन केला तर चालेल का?
हो! कोणताही फोन वापरू शकता. प्रत्येक वेळेस QR कोड स्कॅन केल्यावर नवीन संवाद सुरू होतो. एकाच फोनची गरज नाही.
फक्त इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. लॉगिन किंवा अॅप डाऊनलोड करायची गरज नाही, फक्त स्कॅन करा आणि वाईसाशी संवाद सुरू करा.Alag-alag phones se QR scan kar sakte hain kya?
Haan, bilkul! Koi bhi phone istemaal kar sakte ho.
Har baar scan karne par naya chatstart hota hai.
Bas internet chahiye.
Login ya app download karne ki bhi zaroorat nahi, sirf scan karo aur shuru ho jao.
बॉटसोबत बोलणं उपयुक्त का आहे?
कधी कधी आपल्या मनात खूप भावना आणि विचार असतात, आणि काय करायचं तेच समजत नाही.
वाईसा शिकवते:- भावना खूप झाल्या की शांत कसं व्हायचं
- अधिक मदत करणारे विचार कसे करायचे
- आत्मविश्वास कसा वाढवायचा
- गोंधळलेलं, अडकलेलं किंवा एकटं वाटत असताना काय करायचं
ही तुमच्या खिशातली मैत्रीण नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार असते.
Wysa se chat karna useful kyun hai?
Kabhi kabhi mann mein bohot saari feelings hoti hain aur samajh nahi aata kya karna.
Wysa sikhati hai:- Jab emotions overload ho jayein toh mann shaant karna
- Helpful thoughts lana
- Confidence badhana
- Jab fasa hua, confused ya akela lage toh uske liye kuch karna
Ye tumhare pocket mein ek friend hai, jahan chaho, jab chaho available hai.
रील्स पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?
⛶ (Expand) आयकॉनवर टॅप करा म्हणजे रील पूर्ण स्क्रीनमध्ये दिसेल. यामुळे ती बघणे सोप्पे होईल आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी काहीतरी नवीन शिकता येईल.
Reels dekhne ka best tareeka kya hai?
- Reel video mein jo ⛶ (Expand) icon hai, usko dabao, toh reel full screen mein dikhegi.
- Reels se tum tips aur tricsk ke baare mein aasani se samajh paaoge, taaki phir chatmein tum apne problems ke liye wo practice kar paao.



